• "जाणीव पुर्वक केलेला प्रवास"

संस्थेचे ध्येय व उद्देश

सांस्कृतिक

कोकणातील लोककलांचे संवर्धन, नाट्य व गायनकलेस प्रोत्साहन,अंध अपंग,मतिमंद इ. विशेष गरजा असणा-या मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणे

पर्यावरण

वृ्क्षारोपण व वनसंवर्धन,पर्यावरणविषयक जनजागृतीचे कार्यक्रम करणे,कोकणातील -हास होत असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचे संवर्धनासाठी विविध प्रकारे जनजागृ्ती करणे

शैक्षणिक

समाजातील सर्व स्तरांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करणे,आवश्यक असल्यास बालवाडी,वाचनालय इ. चालविणे. ग्रामीण भागातील शाळांना शैक्षणिक मदत देणे, ग्रामीण भागातील मुलांना विविध कार्यक्रमांव्दारे प्रशिक्षित करणे

क्रिडा विषयक

ग्रामीण तसेच शालेय मुलांना क्रिडासाहित्याची मदत करणे,क्रिडास्पर्धा भरवणे,लोप पावत असलेल्या क्रिडा प्रकारांचे संवर्धन करणे

आरोग्य विषयक

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यविषयक माहिती देणे,साथीच्या रोगांच्यावेळी जनजागृती करणे,आवश्यक असल्यास आरोग्य शिबिरे भरविणे,गरजू गरीब रुग्णांना शक्य ती वैद्यकीय मदत मिळ्वून देणे, रक्तदानाबाबत जनजागृती करणे व लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करणे त्यासाठी आवश्यक वेळी रक्तदान शिबिरे भरविणे

वेळोवेळच्या सामाजिक गरजेनुसार कार्यक्रमाची आखणी आणि पुर्तता करणे

Make a Donation
Paybal button
Become A volunteer