• "जाणीव पुर्वक केलेला प्रवास"

आवाहन

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे.प्रत्येक मानव एकमेकांवर आणि पर्यायाने समाजावर अवलंबून असतो. साहजीकच आपण समाजाप्रती काहीतरी करावे,वंचित,अप्रगत समाजास सुविधा मिळवून दयाव्यात असे प्रत्येकालाच वाटत असते. पण एकटया मनुष्याच्या हातून ही इच्छा पूर्ण होणे कठीण असते. म्हणून प्रत्येकाने आपला खारीचा वाट उचलला तर सामाजिक विषमता कमी करणे,आर्थिक दरी भरून काढणे सोपे जाईल. कदाचित याच विचारातून सामाजिक संस्थांचा उदय झाला असावा.
आम्ही जाणीव फौंउंडेशनव्दारे आमचे समाजाप्रती असणारे कर्तव्य पूर्ण करत आहोत.आरोग्य,क्रिडा,सांस्कृतिक,शैक्षणिक व तत्कालीन विषयांवर अत्यावश्यक सामाजिक उपक्रम राबवून कोकणच्या विकासाला हातभार लावीत आहोत.[ जाणीव च्या ब्लड डोनर डिरेक्टरी या उपक्रमाने अनेक रुग्णांचे प्राण वाचले अहेत.] सामाजिक चळवळीचे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आम्हांस आपणासारख्या दात्यांची आवश्यकता आहे.
आपण आम्हांस आर्थिक,वस्तुरूप,कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेणे,कार्यक्रमात स्वयंसेवक बनणे इ. प्रकारे मदत करू शकता. आपली कोणत्याही प्रकारची मदत आम्हांस महत्वाची आहे. आपण आमच्या आवाहनाला योग्य प्रतिसाद दयाल अशी खात्री आहे.

आमच्या कार्यात सहभागी व्हायचंय ???

जाणीव चे वार्षिक सभासदत्व मिळवण्यासाठी प्रवेश अर्ज फि रु. १०/-
वार्षिक सभासदत्व फि रु. ५००/-
आजीव सभासदत्व फि रु. १०००/-
सभासदत्व नोंदणी अर्ज
आवश्यक कागदपत्रे –
१) फोटोप्रूफ १ प्रत
२) अड्रेसप्रूफ १ प्रत
३) पासपोर्ट साईझ २ फोटो

आपण आपली सभासदत्व फी / जाणीव साठी आर्थिक मदत /कार्यक्रमाच्या प्रायोजकत्वाची मदत आमच्या खालील बँक खात्यात भरू शकता.
बँकेचे नाव-जनता सहकारी बँक लि. पुणे शाखा शिवाजीनगर,रत्नागिरी
खाते नंबर -०२२२२०१००००१२५१
आयएफएससी कोड – JSBP०००००२२
आपले चेक /डीडी खालील नावाने काढावेत.
‘जाणीव फाउंडेशन रत्नागिरी ‘
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा

श्री. महेश गर्दे श्री. अमित सावंत श्री. संजय शिंदे
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
जाणीव फाउंडेशन रत्नागिरी जाणीव फाउंडेशन रत्नागिरी जाणीव फाउंडेशन रत्नागिरी
९४२२००३१२८ ८०८७३३५९०४ ९९६०३१३०७१

Make a Donation
Paybal button
Become A volunteer