-
आमच्या विषयी ``जाणीव`` पूर्वक केलेला प्रवास
``जाणीव`` पूर्वक केलेला प्रवास
पार्श्वभुमीः देशभर किंवा अगदी तगभर कार्यरत असणाय्रा विविध सामाजिक संस्थांमुळेच सर्वसामान्य माणसांचा जीवनस्तर उंचाविण्यास मदत होत असते हे निर्विवाद सत्य आहे.जाणीव फाऊंडेशनची निर्मिती प्रक्रिया अशाच माध्यमातून झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना विविध क्षेत्रांत कार्यरत असताना आम्ही संस्थेच्या स्थापनेपासूनच सामाजिक कार्यात सहभागी होतोच.मात्र या कार्याची दखल घेतली जावी तसेच अतिशय प्राथमिक स्तरावर आवश्यक असणाय्रा बाबींमध्ये काम करणारी आणि पर्यायाने कोकणच्या दुर्लक्षित राहिलेल्या विकासाला हातभार लावणारी संस्था अस्तिवात असावी या भावनेपोटी १५ आँगस्ट २०११ रोजी ``जाणीव फाऊंडेशन रत्नागिरी``या संस्थेची स्थापना झाली.अतिशय कमी मनुष्यबळ आणि कोणतीही आर्थिक मदत न घेता सामान्य कुटुंबातील तरुणांनी निर्माण केलेल्या या संस्थेने अल्पावधितच आपल्या कार्याचा ठसा रत्ननगरीच्या समाज जीवनावर उठविलाच !!!
